Monday, 18 February 2019

एकदंत कॉलनीत रांगोळी रेखाटून शहिदांना श्रद्धांजली


नगर । प्रतिनिधी - पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना एकदंत गणेश मंडळ, एकदंत महिला बचत गट, एकदंत परिवाराच्यावतीने दातरंगे मळा येथील एकदंत कॉलनीत मोठी रांगोळी रेखाटून व त्याभोवती मेनबत्त्या पेटवून श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एकदंत गणेश मंडळाच्यावतीने या भ्याड हल्याचा निषेध करण्यात आला. तसेच कॉलनीत झालेल्या शोकसभेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी श्री गणेश दे वरदान, संपवून टाकू पाकिस्तान, पाकिस्तान मुर्दाबाद,  शहिद जवान अमर रहे, भारत माता की जय आदी घोषणा नागरिकांनी दिल्या.

No comments:

Post a Comment