नगर । प्रतिनिधी - शिवजयंतीनिमित्त शिवप्रहार संघटनेच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवाला सावेडी उपनगरात चांगला प्रतिसाद मिळाला.
भिस्तबाग चौकात झालेल्या या उत्सवाचे उद्घाटन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर, रावजी नांगरे, सोपानराव मुळे, राजेंद्र चोभे, अनिकेत कराळे, प्रा.सीताराम काकडे, म्हस्के सर, डी.आर. शेंडगे, सुरेश कदम, अॅड.रवींद्र शितोळे, इथापे साहेब, राजश्रीताई शितोळे, आशा साठे, पद्माताई गांगर्डे, अनिता काळे, राजेश जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मागील चौदा वर्षांपासून संघटनेच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात येते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस काश्मीर येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना दोन मिनिट स्तब्धता बाळगून आदरांजली वाहण्यात आली. शाहीर डॉ.समाधान इंगळे व सहकार्यांनी गायलेल्या स्फूर्तीगीतांनी प्रेक्षकांना शहारे आणले. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातच भारतीय लोकशाहीचा पाया घातला गेला असा संदेश डॉ. इंगळे यांनी आपल्या सादरीकरणातून दिला.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार गुलाब पुष्प व वैचारिक पुस्तके देऊन करण्यात आला.उत्सव यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कर्डिले, संदीप संसारे, दीपक शिंदे, पै.शिवा शिंदे, विशाल म्हस्के, नितीन ढाळे, राम झीने, प्रमोद भासार आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment