नगर । प्रतिनिधी - क्लासिक लिजंड प्रायव्हेट लि.च्या जावा मोटरसायकलच्या नहार ऑटोमेटीक्स या नगरमधील शोरूमचा शुभारंभ कंपनीचे चीफ एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर आशिषसिंग जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खासदार दिलीप गांधी, डीलर मनोज नहार, मनीष नहार, साहिल नहार, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, विक्रम फिरोदिया, कंपनीचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जोशी म्हणाले की, नगरमधील युवकांची नव्या व स्टायलिश मोटार सायकलची क्रेझ व गरज पाहून नगरचे डीलर नहार परिवाराच्या समवेत सुरु करण्यात आलेले हे महाराष्ट्रातील नववे शोरूम आहे. भारतात आजपर्यंत शंभर शोरूम सुरु करण्यात आली असून सगळ्याच ठिकाणी उत्तम प्रतिसाद लाभला आहे. येत्या काळात नवनवीन स्कीम व फायनान्सच्या योजनाद्वारे जावा दुचाकी उपलब्ध होतील.
द जावा व जावा फोर्टी टू या दोन मॉडेलचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आकर्षक रंग, स्मूथ बटन स्टार्ट, 299 सीसी लिक्विड कुल इंजिन, आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या या दुचाकींचा अनुभव अविस्मरणीय असा निश्चित असल्याची माहिती जोशी यांनी दिली.
खासदार गांधी यांनी या प्रसंगी नहार परिवाराला शुभेच्छा दिल्या. काळाची गरज ओळखून व सर्वोत्तम सेवा दिली तर व्यवसाय यशस्वी होतो. जावा शोरूमच्या माध्यमातून सर्वोत्तम सेवा मिळेलच यात शंका नाही, असे सांगितले.
नहार परीवाराच्या वतीने मनोज नहार यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला. नगरमधील मोहनलाल मानधना, श्रीमती छायाताई फिरोदिया, श्रीमती आशाताई फिरोदिया, गौरव फिरोदिया, महेंद्र कुलकर्णी, संदीप ऋषी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment