नगर । प्रतिनिधी - ‘युवासेना’ ही फक्त युवासेना नसून ‘युवासेवा’ आहे. युवक हा देशाचे भविष्य आहे. त्यामुळे प्रत्येक युवक हा सक्षम झालाच पाहिजे, तरच आपल्या देशाचे भविष्य उज्वल होईल. आजच्या स्पर्धेच्या जीवनात अनेक अडीअडचणी विद्यार्थ्यांच्या समोर येत असतात. प्रत्येक युवक हा युवासेनेचा धागा झाला पाहिजे आणि तो युवासेनेच्या प्रवाहात वाहिला पाहिजे. जेणे करून त्याला त्याच्या अडचणी सोडवता येतील. त्यामुळे तरूणांनी अडीअडचणी सोडविण्यासाठी युवासेनेत सहभागी व्हायला हवे असे आवाहन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले आहे.
अहमदनगर युवा सेनेच्यावतीने नगर शहरातील सारडा कॉलेज येथे युवा सेना सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ युवकांना नोंदणी पत्र देऊन जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी युवा जिल्हाप्रमुख (उत्तर) रवी वाकळे, मृणाल भिंगारदिवे, शाम सोनवणे, अंकुश चोपडा, ऋषिकेश अष्टेकर, नरेश भालेराव, अक्षय नागापुरे, विकी पवार, निखील भोईर, प्रशांत झामरे, प्रशांत गोसके, विनोद हारबा, जय बिडकर आदि उपस्थित होते.
राठोड म्हणाले की, सर्व युवकांचे तसेच युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी युवासेना काम करत आहे. लवकरच प्रत्येक कॉलेज मध्ये युवासेना कक्ष सुरु होणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या सारखे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला लाभले, ज्यांचा माध्यमातून आम्ही कायम युवा पिढीच्या न्याय हक्कासाठी लढा उभारून त्यांना या दगदगीच्या जीवनात अडचणी सोडवण्यास मदत करण्याचे काम करतो. आम्ही इतरांसारखे फक्त दोन ते तीन दिवस काम करून थांबत नाही.
त्यामुळे युवकांचे प्रश्न युवा सेनेच्या माध्यमातून सूटतील असा विश्वास अहमदनगरच्या जनतेला आहे. युवासेनेच्या नोंदणी अभियानाला युवक उत्सफुर्त प्रतिसाद देत आहेत. आम्ही सर्व युवक ऐतिहासिक अहमदनगर भुईकोट किल्ला येथे साफसफाई करून स्वच्छ आणि सुंदर किल्ला करण्याचाही उद्देश आहे. युवकांनी, युवतींनी अडचणी सोडविण्यासाठी युवासेनेत सहभागी झाले पाहिजे.
No comments:
Post a Comment