नगर । प्रतिनिधी - येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या 9 सदस्यांनी एका दिवसात तब्बल 9 किल्ले सर करत बाईक ट्रेक मोहिमेचा नवीन विक्रम स्थापित केला.अनिल वाघ, वैभव लोटके, प्रथमेश ढेरे, अविनाश धामणे, रोहित नाटे, माऊली जमदाडे, नाना खंडागळे, सचिन जमदाडे, सुमंत सुरवसे यांनी या मोहिमेत भाग घेतला. इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्या सदस्यांनी रविवारी (दि. 3) मोटरसायकलवरुन हडसर, निमगिरी, हनुमंतगड, सिंदोळा, जीवधन, शिवनेरी, चावंड, जुन्नर भुईकोट, नारायणगड हे किल्ले सर केले. इंद्रप्रस्थ ट्रेकर्सने याआधी मोटरसायकलवरुनच 4 दिवसात 1608 किलोमीटरचा प्रवास करत 27 किल्ले सर केले होते.
रविवारी पहाटे 5 वाजता या मोहिमेस प्रारंभ केला. प्रारंभी किल्ले हडसर येथे (2 तास) सकाळी 8 वाजता पोहचले. निमगिरी व हनुमंतगड (2 तास) सकाळी 11 वाजता, सिंदोळा (2.30 तास) दुपारी 2 वाजता, जीवधन (2 तास) दुपारी 4.30 वाजता, शिवनेरी (1.15 तास) सायंकाळी 6.15 वाजता, चावंड (1 तास) रात्री 8 वाजता, जुन्नर भुईकोट (15 मिनिट) रात्री 9.30 वाजता, नारायणगडावर (1 तास) रात्री 10 वाजता या मोहीमेचा शेवट करण्यात आला.
इंद्रप्रस्थ ट्रेकर्सच्यावतीने दर महिन्याला गड व किल्ल्यांवर ट्रेकचे आयोजन केले जाते.
No comments:
Post a Comment