नगर । प्रतिनिधी - औषधाच्या दुकानात जेव्हा आपण कॅप्सुल-सिरप घेतो, तेव्हा आपल्याला त्यावरील पॅकिंग व निर्मितीचे कुतूहल वाटते. पण जेव्हा ती कॅप्सुल कशी तयार होते. पातळ औषध कसे तयार करतात? याची प्रत्यक्ष पाहणी करुन अनुभव घेताना वेगळाच आनंद मिळाल्याने विद्यार्थी अक्षरक्ष: भारावुन गेले होते.
अहमदनगर येथील डॉ.ना.ज.पाऊलबुधे फार्मसी कॉलेजच्या द्वितीय वर्ष औषध निर्माण शास्त्रच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद येथील मल्टी नॅशलन कंपनी अजंता फार्म ली.ला भेट दिली.
यावेळी अनुभव घेताना कच्च्या मालापासून ते अंतिम उत्पन्नापर्यंत काय-काय प्रोसेस असतात हे बघितले. यावेळी कंपनीचे मानव संसाधन प्रबंधक पोपट धनक यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण युनिट फिरवून तेथे तयार होत असलेल्या कॅप्सूल व सिरप बद्दल सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. आणि या चांगल्या अनुभवाने आम्ही भारावलो अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.
या भेटीसाठी पाऊलबुधे कॉलेजचे प्राचार्य डॉ.शांताराम खणगे, प्रा.अनुराधा चव्हाण, प्रा.सुरेखा बारवाल, प्रा.शुभांगी अलभर, शामल सरोदे, सौ.राजश्री सुंबे, कल्याणी अवताडे, प्रा.प्रसाद घुगरकर, अजय अनपट, बबलु शेख आदींनी व्यवस्थापन करुन मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment