नगर । प्रतिनिधी - गुलमोहोर रोडवरील मंगल हौसिंग सोसायटीत अंतर्गत ड्रेनेजलाईनच्या कामाचा प्रारंभ आ. संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी अजिंक्य बोरकर, नगरसेवक मनोज दुलम, नगरसेविका आशाताई कराळे व सोनाबाई शिंदे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संपत नलवडे, उषाताई नलवडे, संभाजी पवार, तायगा शिंदे, अमोल गाडे, सोसायटीचे अध्यक्ष जालिंदर तनपुरे, सेक्रेटरी सुनील कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, नगरसेवकांनी या प्रभागातील महत्त्वाची कामे सूचवा. त्यासाठी आपण निधी देऊ, तसेच या सोसायटीत लवकरच जॉगिंग ट्रॅक सुरू होईल. सोसायटीच्या शेजारी असणार्या नाल्याची दुर्गंधी येते, हाही प्रश्न लवकरच मार्गी लावू.
आ. संग्राम जगताप म्हणाले की, शहरात बससेवा कशी परत सुरू करता येईल, यासाठी आपण आगामी काळात प्रयत्न करणार आहोत. नगर शहरात पुन्हा लालपरी धावायला पाहिजे, ही सर्व नगरकरांची इच्छा आहे. सोसायटीतील अंतर्गत कामाचा येथील रहिवाशांनी सतत पाठपुरावा केला. त्यामुळे आता सर्व कामे मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, तसेच सीना नदीचा 14 कि.मी.चा टप्पा आहे. तोही लवकरच विकसित होणार आहे. त्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
याप्रसंगी प्रकाश दसरे व राजीव गुजर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक जोशी यांनी केले. प्रास्ताविक जालिंदर तनपुरे यांनी केले. सुनील कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सूर्यकांत आघारकर, तुषार हिरवे, दिलीप देशपांडे यांनी केले. याप्रसंगी गोपाल सुवर्णपाठकी, निशा डावरे, शरयू करंदीकर, विठ्ठल बुलबुले, सुहास मुळे, कैलास दळवी, डॉ. अशोक गायकवाड, जयश्री जोशी, शरद देशमुख, उद्योजक गौरव गंधे, चंद्रकांत पाटील, मनपाचे इंजि. पारखे, राजू येळीकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment