नगर । प्रतिनिधी - महसूल आणि पोलीस प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा विशेषतः विद्यमान खासदारांचा कुठलाही वचक नाही त्यामुळे रेशन कार्ड, ‘डोल’ची प्रकरणे, स्वस्त धान्य, शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी प्रशासन करत नाही. अशा वेळेस विद्यमान खासदारांनी प्रशासनावर वचक निर्माण करून लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मात्र, विद्यमान खासदारांना प्रशासनावर वचक निर्माण करणे दूरच, पण साधा जाब विचारायची हिंमत राहिली नाही.त्यामुळे खासदारांना संविधानाने अधिकार देऊन सुद्धा खासदार लोकांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. याउलट 50 वर्षांपेक्षा जास्त राजकारणात व समाजकारणात काम करणार्या विखे पाटील कुटुंबाने नीतिमत्ता शाबूत ठेवल्यामुळे त्याच प्रशासनाकडून 10 हजार रेशनकार्ड गरिबांना वाटू शकलो याच आपल्याला सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले.
टाकळी खातगाव (ता. नगर) येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन, लोकार्पण व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
प्रशासन लोकांच्या समस्यांकडे असंवेदनशीलपणे बघते. अशा वेळेस लोकांना लोकप्रतिनिधींचा आधार असतो. त्याच्याकडे लोक आशेने बघतात. वास्तविक पाहता भारतीय संविधानाने खासदाराला भरपूर अधिकार दिले आहेत. खासदाराने ठरवले तर तो आपल्या भागाचा चेहरामोहरा बदलू शकतो. मात्र जर तोच खासदार राजकारणात काही प्रलोभनाला बळी पडला असेल तर असा खासदार लोकांचे प्रश्न घेऊन प्रशासनाला काय जाब विचारणार? अशा खासदाराला विक्रमी मताधिक्क्याने जर आपण निवडून देत असाल तर तो दोष सर्वस्वी सामूहिकपणे आपलाच असल्याचे सुद्धा ते म्हणाले. येणारी लोकसभा ही अहमदनगर दक्षिण मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असून जर आपण परिवर्तन करू शकलो नाही तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे आपण जागरूकपणे उमेदवाराचे कर्तृत्व बघून मतदान करावे असे आवाहन त्यानी उपस्थितांना केले.
याप्रसंगी शाळा डिजिटलायजेशन, पाइप लाईन, रस्ता भूमिपूजनचे कार्यक्रम विखेंच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, प्रताप शेळके, अरुण होळकर, बलभीम पठारे, टाकळी खतगाव ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment