नगर । प्रतिनिधी - नाथ संप्रदायात सर्वात महत्वाचा उत्सव असणारा धर्मनाथ बीज नगर तालुक्यातील मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ गडावर बुधवारी (दि. 6) होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गोरक्षनाथ महाराज ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 6 फेबुवारीला सकाळी 8 ते 10 यावेळेत महापूजा व अभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 ते 12 आळंदीचे श्रीकांत महाराज गागरे यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी 12 ते 3 यावेळेत नाथ भक्तांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मनाथ बीजेला दर्शनासाठी याठिकाणी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत असते.
वर्षभर भाविक व पर्यटक या ठिकाणी रोज येत असतात. येथील स्मृती मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. धर्मनाथ बीजेच्या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष अॅड शंकरराव कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, उपाध्यक्ष जयराम कदम, खजिनदार मारुती कदम, सरपंच जालिंदर कदम यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment