Wednesday, 6 February 2019

अशोकभाऊ फिरोदिया स्मृती शालेय व खुल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ


नगर । प्रतिनिधी - अ. नगर एज्युकेशन सोसायटी व जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित अशोकभाऊ फिरोदिया स्मृती शालेय व खुल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आ. अरुण जगताप यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले.
यावेळी सिनेअभिनेते राजेंद्र गटणे, अ. नगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, गौरव फिरोदिया, अशोक मुथा, प्रकाश गांधी, कलीम मर्चंट, सुनंदा भालेराव, गौरव मिरीकर, असो.चे प्रा. माणिक विधाते, गणेश गोंडाळ, श्रीकांत निंबाळकर, बाळासाहेब नरसाळे, दादा देवकाते, गणेश बुरा, रावसाहेब बाबर आदी उपस्थित होते.
यावेळी आ. जगताप म्हणाले, नगरमध्ये क्रिकेट खेळासाठी अत्यंत पोषक वातावरण असून शालेय विद्यार्थ्याना एक उत्तम व्यासपीठ या स्पर्धेमुळे उपलब्ध झाले आहे. भविष्यात ही स्पर्धा देश पातळीवर नावलौकिक प्राप्त करेल.प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया म्हणाल्या, अशोक फिरोदिया यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही क्रिकेट स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून घेण्यात येत असून यापुढेही सतत सुरू राहील. शालेय स्तरावर क्रिकेटची संधी मिळाली तरच उत्कृष्ठ खेळाडू निर्माण होतील. जिल्ह्यातील व राज्यातील शालेय खेळाडूंना या स्पर्धेतून संधी मिळेल व त्याचा निश्चित फायदा होईल.
अशोकभाऊ फिरोदिया स्मृती शालेय क्रिकेट स्पर्धा 12 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून यात 16 संघ सहभागी झाले आहेत. खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धा 12 ते 28 फेब्रुवारीदरम्यान फ्लड लाईटमध्ये होणार असून यात 32 संघ सहभागी होणार आहेत. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा असो. तर्फे सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गणेश बुरा यांनी केले. गौरव फिरोदिया यानी आभार मानले. यावेळी स्पर्धेतील पहिला सामना  अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व रेसिडेन्शियल संघात झाला.

No comments:

Post a Comment