नगर । प्रतिनिधी - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शेतकर्यांचे प्रश्न आणि लोकपाल नियुक्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वाळकी (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करुन पाठिंबा दिला.
भ्रष्टाचार निर्मूलन, शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी अण्णा हजारे यांनी राळेगणसिध्दी येथे उपोषण सुरू केले आहे. केंद्र व राज्य शासनाला दरवेळी स्मरणपत्र देऊनही याची दखल न घेतल्याने अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसली तरी वाळकीसह परिसरातील वडगाव, तांदळी, देऊळगाव, राळेगण, गुंडेगाव, रुई छत्तीशी आदी गावातून आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे.
अण्णांनी सुरू केलेल्या आंदोलनाला ग्रामीण भागातून सुरू असलेल्या आंदोलनामुळे पाठिंबा वाढतच आहे. गावात आंदोलन करून ग्रामस्थ राळेगणसिध्दी येथे अण्णा हजारे यांची भेट घेवून पाठिंब्याचे पत्र देत आहेत.
वाळकी येथील ग्रामस्थांनी दि.5 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करून अण्णांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
या आंदोलनात सरपंच शरद बोठे, ग्रा.पं.सदस्य देवराम कासार, किशोर भालसिंग, पंडीत बोठे, पेन्शनर संघटनेचे मोहनराव बोठे, बाळासाहेब भालसिंग , दादाभाऊ बोठे, ज्ञानदेव बोठे, साहेबराव कासार, माजी सैनिक संघटनेचे बाबासाहेब कासार आदींसह चंद्रभान बोठे, नानासाहेब सुपेकर, हौसराव कासार, शिवाजी सुपेकर, भास्कर कासार, विलास लोखंडे, यशवंतराव म्हस्के आदींसह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभागी झाले.
No comments:
Post a Comment