नगर । प्रतिनिधी - आजच्या विद्यार्थी हा कौशल्याचा घडा आहे. त्याला भरुन वाहू द्या. स्वत:भोवताली होत असलेल्या घटनांचे विश्लेशन करुन नवनीवन संकल्पनांना उजाळा देण्यासाठी मुले उत्सुक स्वाभावाचे असावेत. भारतातील युवा हा टेक्नॉलॉजी वापरणारा बनत चालला आहे. आता मात्र हा युवा टेक्नॉलॉजीत नवीन शोध लावणारा व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. विलास गायकर यांनी केले.
अहमदनगर महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य आर. जे. बार्नबस व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.
गायकर पुढे म्हणाले, महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणार्या सर्व सुविधा आणि शिक्षण यांचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजात सकारात्मक बदल करण्यासाठी केला पाहिजे. विद्यार्थीं आपला विकास करताना देशाचा आणि आपल्या कुटुंबाचे नाव कसे उज्वल होईल, याचा विचार करुनच निर्णय घेतले पाहिजे.
प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. बार्नबस म्हणाले, महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी मोठा कल आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण सुविधा उपलब्ध करुन देत असतोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज भारतात आणि देशात विविध क्षेत्रात आपले आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
यावेळी बेस्ट स्टुडंट ऑफ इयर, बेस्ट एन. एस. एस. व्हॉलेंटीयर, बेस्ट स्पोर्ट या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. तुशिता अय्यर यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
No comments:
Post a Comment