Tuesday, 5 February 2019

नालेगाव-निंबळक रस्त्यासाठी 3 कोटी मंजूर : आ.संग्राम जगताप


नगर । प्रतिनिधी - नालेगांव येथील वारूळाचा मारूती ते निंबळक बायपास रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 3 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
प्रसिध्दीपत्रकात आ.जगताप यांनी म्हटले आहे की, शहर मतदारसंघातील नालेगांव व वारूळाचा मारूती परिसरातील शेतकर्‍यांच्या दृृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला या भागातील हा मुख्य रस्ता आहे. या भागातील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने व शासन स्तरावर पाठपुरावा केला. पण त्यांना याबाबत यश आले नाही. याप्रश्नी माझ्याकडेही मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासन स्तरावर पाठपुरावा करून सदरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रस्तावित करून अंदाजे 3 कोटी रूपयांच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. लवकर याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. या रस्त्याची देखभाल दुरूस्ती संबंधित विभागाकडून काम पूर्ण झाल्यानंतर 5 वर्षे करण्यात येणार आहे. यामुळे नालेगांव परिसरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

No comments:

Post a Comment