Wednesday, 13 February 2019

हुंडेकरी स्पोर्ट संघाचा दणदणीत विजय


नगर । प्रतिनिधी - अशोकभाऊ फिरोदिया स्मृती फ्लड लाईट खुल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेतील पहिला सामना हुंडेकरी स्पोर्ट संघाने 112 धावांनी जिंकला.
अ. नगर एज्युकेशन सोसायटी व जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित अशोकभाऊ फिरोदिया स्मृती फ्लड लाईट, खुल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नवीन मराठी विश्रामबाग शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना भणगे यांच्या हस्ते टॉस करून झाला.
यावेळी  क्रिकेट असोसिएशनचे प्रा. माणिक विधाते, गणेश गोंडाळ, श्रीकांत निंबाळकर, गणेश बुरा,  रावसाहेब बाबर, मंगेश उपासनी, प्रीतम जाधव, कैलास करपे, संदीप घोडके, अतिश भांबरे, अंबादास शिरसाठ उपस्थित होते.
हुंडेकरी स्पोर्ट व शिरसाठ स्पोर्ट पाथर्डी यांच्यात पहिला सामना झाला. 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून हुंडेकरी संघाने 223 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल शिरसाठ स्पोर्ट पाथर्डी संघाला सर्व विकेट गमावून अवघ्या 111 धावा करता आल्या. त्यामुळे हुंडेकरी स्पोर्ट संघ 112 धावांनी विजयी झाला.
अशोकभाऊ फिरोदिया स्मृती खुल्या गटातील क्रिकेट स्पर्धा फ्लड लाईटमध्ये होत असून यात 32 संघ सहभागी झाले आहेत. 28  फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा चालणार आहेत. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
 सूत्रसंचालन बाबर यांनी केले. गणेश बुरा यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment