नगर । प्रतिनिधी - स्कूल स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने हरियाणातील रोहतक येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील शालेय एथलेटिक्स 14 वर्षाखालील 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत महाराष्ट्राने सुवर्णपदक पटकाविले. त्यात नगरच्या दिव्यांगी लांडे हिने महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
या स्पर्धेअगोदर दिव्यांगीने स्पोर्टस् फेडरेशनच्या राज्यस्तरीय स्पर्धेत शंभर व दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. महाराष्ट्राला 4 बाय 100 मीटर रिलेत सुवर्णपदक जिंकून देणार्या संघात दिव्यांगीसोबत मुंबईची सानिया सावंत, त्रिवेणी तावडे व औरंगाबादची साक्षी चव्हाण यांचा समावेश होता. दिव्यांगी लांडे ही नगर-कल्याण रोड येथील उध्दव अॅकेडमी इंग्लिश मिडियम स्कूल शाळेची विद्यार्थिनी आहे. तिला शाळेचे क्रिडा प्रशिक्षक सुनील मोहिते यांचे मार्गदर्शन मिळाले.
या यशाबद्दल तिचे संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई जाधव, सेक्रेटरी अॅड. जयंत जाधव, प्राचार्या निशिता जाधव, प्रशासक अनिल दारकुंडे यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment