नगर । प्रतिनिधी - नगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एनएमएमएस) नेत्रदीपक यश संपादन केले आहे. नोव्हेंबर 2018मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 16 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यापैकी चैतन्य राजाराम चौधरी याने 111 गुण व वैष्णवी कैलास गिरवले हिने 108 गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी प्राप्त ठरले आहेत.
शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांसह संजय गिरवले, पी. एस. बोरकर उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक जी. एन. बेल्हेकर, एम. जी. घोडके, श्रीमती ए. जी. आहेर, सौ. एस. एस. शेळके यांचे मार्गदर्शन लाभलेे. याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे मुख्याध्यापक शिंदे, स्कूल कमिटी चेअरमन दादाभाऊ चितळकर, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment