Tuesday, 5 February 2019

अद्यावत ब्लड डोनेशन व्हॅनचे ना. बापटांच्या हस्ते लोकार्पण


नगर । प्रतिनिधी - रक्तविघटन प्रयोगशाळा व अफेरेसिस तंत्रज्ञानासह सुसज्ज असलेल्या नगरच्या अष्टविनायक ब्लड बँकेच्या सेवेत नुकतीच अद्ययावत ब्लड डोनेशन व्हॅन दाखल झाली आहे. या व्हॅनचा लोकार्पण सोहळा पुणे येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात राज्याचे अन्न व औषधे प्रशासन मंत्री ना. गिरीश बापट यांच्या हस्ते नुकताच झाला.
याप्रसंगी अष्टविनायक रक्तपेढीचे संचालक डॉ. शैलेंद्र पाटणकर, डॉ. ललित जोशी, डॉ. प्रज्ञा जोशी, डॉ. दिलीप दाणे, तसेच प्रशासकीय अधिकारी जितेंद्र पलिकुंडवार यांच्यासह भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटक रवी अनासपुरे, कोथरूड भागाच्या नगरसेविका छायाताई मारणे व भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कुलदीप सावळेकर आदी उपस्थित होते.
या अद्ययावत व्हॅनमध्ये 2 डोनर कोच, रूफटॉप ए.सी., जनरेटर, टी.व्ही., ऑक्सिजन सिलिंडर, फायर फायटर, तसेच रक्त पिशवी साठवणुकीसाठी फ्रीज आदी सुविधा उपलब्ध आहे. या व्हॅनमध्ये कॉफी मशीन, आरओ वॉटर, डॉक्टरांसाठी टेबल, खुर्ची यांचीही सोय आहे. या व्हॅनमध्ये यापुढे रक्तदान शिबिरेही घेता येणार असल्याचे डॉ. शैलेंद्र पाटणकर यांनी सांगितले. या सोयीसुविधांचा फायदा रक्तदान शिबिर संयोजकांनी घ्यावा, असे आवाहन अष्टविनायक रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment