नगर । प्रतिनिधी - मागील वर्षी घेण्यात आलेल्या एलिमेंटरी चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेने (सांगळे गल्ली) घवघवीत यश मिळविले.
संजली संजय वल्लाकट्टी हिने ए ग्रेड मिळाविला असून, बी ग्रेडमध्ये 17 विद्यार्थी, तर सी ग्रेडमध्ये 51 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक संदीप गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेने व शाळेने कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी ल. दि. सोनटक्के, प्र. स. ओहोळ, शालेय समिती चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य विश्वेश भालेराव, शाळेचे मुख्याध्यापक अजय महाजन, शाळेतील शिक्षिका वैशाली मगर, तिलोत्तमा क्षीरसागर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment