Monday, 4 February 2019

आदित्य रासकरच्या आकस्मित निधनाने हळहळ


नगर । प्रतिनिधी - शहरातील वृत्तपत्र विक्रेते व दसरेनगर येथील रहिवासी छबुराव रासकर यांचे चिरंजीव आदित्य याचे रविवारी सकाळी आकस्मित निधन झाले.
रासकर यांच्या एकुलत्या एक मुलाच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. इयत्ता 5वीमध्ये बायजाबाई शाळेत शिक्षण घेत असलेल्या आदित्याला खोकला येतो, म्हणून तपासणीला नेले. तेथे विविध तपासण्या केल्यावर पुण्याला हलवण्यास सांगण्यात आले. तांबड्या पेशी जास्त प्रमाणात वाढल्याने शरीरात रक्त राहिले नाही. रक्त देऊनही फरक पडत नव्हता. ब्लड कॅन्सर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील उपचारासाठी प्रयत्न करण्यासाठी आदित्याचे वडील प्रयत्नशील होते. पण रविवारी (दि. 3 फेब्रुवारी) सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
मृत आदित्यवर अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्व क्षेत्रांमधील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्य हा शाळेत खूप हुशार होता. त्याला हा आजार झाला हे कुटुंबाला तो कधीच आजारी पडला नसल्याने समजलेच नाही. त्याच्या अकाली मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्यामागे आई, वडील, बहीण, आजी असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment