नगर । प्रतिनिधी -
दंतरोग हा सर्व वयोगटात आढळणारा रोग असून दातांची काळजी घेण्यासाठी अनेकजण चाल-ढकल करताना दिसतात, उपचारात टाळाटाळ करतात. परंतु इतर अवयवांबरोबरच दातांची देखील आपण वारंवार तपासणी केली पाहिजे. त्यावर उपचार केले पाहिजेत. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षांपासून सुरु असलेली सर्व रोगांवरील शिबिरे ही निश्चितच हजारो रुग्णांचे रोग निदान होऊन हे रुग्ण योग्य उपचारांनी बरे झाले. चांगल्या रुग्णसेवेतून, उपक्रमातून, आनंदऋषी हॉस्पिटलच्या माध्यमातून ही सेवा सुरु राहून हॉस्पिटलचा नावलौकिक वाढत राहील, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एम. मुरंबीकर यांनी केले.
राष्ट्रसंत प. पु. आनंदऋषी महाराजांच्या सत्ताविसाव्या पुण्यस्मृतिदिननिमित्त आयोजित दंत रोग तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरासाठी स्व. श्रीमती श्रीकुवरबाई नारायणदास लोढा यांच्या स्मृतीत सतीश व संजय लोढा व परिवाराचे योगदान लाभले. याप्रसंगी सर्वश्री. सुमित व कुणाल लोढा, सौ. उज्ज्वला, सौ. सुनीता, सौ. भाग्यश्री लोढा व परिवार तसेच अॅड. धनराज खाबिया, विठ्ठलदास बाफना, संतोष बोथरा, प्रकाश छल्लाणी, डॉ. संजय सांगळे, वसंत चोपडा, महात्मा फुले जनारोग्य सेवेचे अधिकारी डॉ. मयूर मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मुरंबीकर यांच्या हस्ते या शिबिराचा दीपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ. मुरंबीकर पुढे म्हणाले की, हॉस्पिटल अनेक आहेत, शिबिरेही भरपूर होतात. परंतु आनंदऋषी हॉस्पिटलची शिबिरे ही खर्या अर्थाने कारणी लागतात. कारण अतिशय माफक दरात अत्याधुनिक चांगली सेवा हे हॉस्पिटल देते. आजमितीत दोनशे पन्नास रुग्णांची सोय असलेले हे हॉस्पिटलमध्ये जरी क्षमता वाढली तरी गुणवत्तेत मात्र कमी नाही. हे सर्वांनी लक्षात घ्य्यावे. अशा चांगल्या प्रकारची सेवा देणारे हे हॉस्पिटल म्हणजे आरोग्याचे मंदिर असे संबोधले जाते, ही बाब नागरकरांसाठी अभिमानाची आहे.
याप्रसंगी सुरुवातीला डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सर्वांचे स्वागत केले व या हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या सत्तावीस वर्षांपासून सुरु असलेल्या रुग्णसेवा कार्याची सविस्तर माहिती दिली.
या शिबिरासाठी योगदान देणार्या परिवारातील सदस्य सौ. भाग्यश्री लोढा, तसेच विठ्ठलदास बाफना, धनराज खाबिया यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिबिरासाठीचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते सतीश लोढा यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरात दंतरोग तज्ञ डॉ. सायली पवार, डॉ. प्रणव डुंगरवाल यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. दोनशे पंचेचाळीस रुग्णांची या शिबिरात तपासणी करण्यात आली. संतोष बोथरा यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय वारकड यांनी केले.
No comments:
Post a Comment