नगर । प्रतिनिधी -
नगर येथील केअरिंग फ्रेंड्स संस्थेच्या वतीने पुणे येथील द सोसायटी फॉर डोअर स्टेप स्कूल यांच्या सहकार्याने समाजातील वंचित घटकातील मुलांसाठी चला वाचूया अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेली आदिवासी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येवू लागली आहेत.
या अभियानात संस्थेच्या वतीने पिंपळगाव माळवी, बुरुडगाव, वाळूंज, दहिगाव, घोडेगाव परिसरातील पालांवर, वाड्या वस्त्यांवर जावून शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. या ठिकाणी अभ्यास वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या बालकांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुलांच्या शरीराबरोबरच त्यांच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी त्यांच्यात वाचन संस्कृती रुजविणे आवश्यक आहे. त्यामुळे चला वाचूया हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानात यशस्वी ठरलेल्या बालकांचा कौतुक सोहळा नुकताच नेप्ती येथील उत्कर्ष बालघर येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक संघटना नगर शहराध्यक्ष प्रसाद शिंदे, उपाध्यक्ष भाऊसाहेब पुंड, केअरिंग फ्रेंड्स संस्थेचे सचिव अंबादास चव्हाण, संस्थेचे मार्गदर्शक मोरेश्वर मुळे, प्रमोद पाठक, श्री. ढाकेफळकर, प्रा. आरती थोरात, अॅड.संतोष गायकवाड, श्री. फडके यांच्यासह द सोसायटी फॉर डोअर स्टेप स्कूलचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment