नगर । प्रतिनिधी -
चास येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शाखेच्या 11 विद्यार्थ्यांची पुणेस्थित टाटा कम्युनिकेशन लिमिटेड या कंपनीद्वारे अंतरवासीयतेसाठी निवड करण्यात आली. दिनांक 5 एप्रिल रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मुलाखतीसाठी प्रा. यशांजली सिसोदिया यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन, उपप्राचार्य प्रा. मोहन शिरसाठ, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. सचिन कर्डीले व संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सौ. विद्या जगताप यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment