Saturday, 13 April 2019

मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत अनुमीत पात्रेचे सुयश


नगर । प्रतिनिधी -
मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परिक्षेमध्ये जि. प. प्रा. शाळा झगरेवस्ती (देवगड फाटा) केंद्र-प्रवरासंगम, तालुका नेवासा या शाळेतील विद्यार्थी अनुमीत अमित पात्रे (इ.2 री) याने 200 पैकी 196 गुण मिळवून महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावला. अनुमीत यास या शैक्षणिक वर्षात अनेक चित्रकला स्पर्धेत बक्षिसे मिळाली आहेत. तसेच टॅलेंट सर्च प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळवला. अनुमीत याचे शिक्षणाधिकारी काठमोरे, गटशिक्षणाधिकारी साठे, केंद्र प्रमुख ढोले, मुख्याध्यापक झगरे आदींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment