नगर । प्रतिनिधी -
2016 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या परीक्षेतून नागलवाडी, ता. शेवगांव येथील सौ.दैवशाला गर्जे-आंधळे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. गर्जे यांनी लग्नानंतर संसार सांभाळून शिक्षण करत इच्छाशक्ती मनाशी बाळगून हे यश मिळविले. पती हर्षद रावसाहेब आंधळे यांच्या खांद्याला खांदा लावून संसार करतानाच परिस्थितीचा सामना करत प्रयत्नवादी विचारातून पुढे वाटचाल केली. दैवशाला यांनी नागलवाडी गावच्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी होण्याचा मान मिळवले आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण हे वनवेवाडी येथे केले. पुढील शिक्षण हे शेवगाव, पाथर्डी येथे केले. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment