Wednesday, 17 April 2019

बालगोपालांसाठी मोफत हसत खेळत राजयोगा मेडिटेशन शिबिर ः डॉ. कांकरिया


नगर । प्रतिनिधी -
येथील आनंदऋषिजी मेडिटेशन सेंटरमध्ये यंदाच्या सुट्टीत खास बालगोपालांसाठी मोफत हसत खेळत राजयोगा मेडिटेशन शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती संचालिका डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली.
 सध्याच्या जगात मुलांवर अभ्यासाच्या ओझ्याबरोबरच वाढत्या टी. व्ही., कॉम्प्युटर, मोबाईलच्या अति वापरामुळे अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे बहुतांश मुलांच्या स्वभावात चंचलता वाढत चालली आहे. तसेच विभक्त कुटुंब पध्दतीमुळे मुलांचे भावनिक जग विखुरले जात आहे. सुसंस्काराचा अभाव जाणवत आहे. यावर उपाय म्हणजे पालकांनी मुलांसाठी प्रेमळ वेळ देणे व त्यासोबतच मुलांनी राजयोगा मेडिटेशन करणे हे होय. राजयोगा मेडिटेशनमुळे मुलांची चंचलता कमी होईल, एकाग्रता, शांतता व स्मरणशक्तीत वाढ होईल तसेच निरोगी आरोग्य निर्माण होण्यास मदत होईल. सदर शिबिर वयोगट 5 ते 15 वर्षांसाठी आहे. तसेच 10 वर्षाखालील मुलांच्या सोबत पालकांनी येणे आवश्यक आहे. सदर कोर्स हा आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर, ब्लड बँकेच्या बेसमेंटला, अहमदनगर येथे दिनांक 22 एप्रिलपासून 5 दिवस रोज सकाळी 10 ते 11.30 या वेळेत होईल.
नावनोंदणीसाठी प्रिया दिदी 9850887838, दत्तात्रय वाडकर 9766494901 यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहनही डॉ. कांकरिया यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment