नगर । प्रतिनिधी -
लालटाकी रोडवरील महाराष्ट्र बालक मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मंथन पब्लिकेशन्स संचलित मंथन टॅलेट सर्च परीक्षेत घवघवीत यश मिळविले.
विराज कुलांगे हा राज्यात आठवा व प्रथमेश सांगळे राज्यात 5 वा आला. या विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक सुरेश शेवाळे यांनी सन्मान केला.
गुणवंत विद्यार्थी याप्रमाणे ःइयत्ता 2 री - नकुल सुरवे, आदित्य ढवळे, दुर्गेश शिंदे, सोहम कमानदार, वेदांत भांड, विराज भोर, कृष्णा राजळे.
इयत्ता 3 री - समर्थ आंधळे, साईदीप खाडे, आराध्या ठोंबरे, भूमिका म्याकल, अर्पणा नरवडे, अनाम पठाण.
इयत्ता 4 थी - विवेक आंधळे, आकांक्षा शिंदे, चैतन्य रंगाटे.
इयत्ता 2 रीच्या विद्यार्थ्यांना सौ. स्मिता म्हस्के, सौ. सुनीता शेवाळे, श्रीमती अमृता पुरी व श्रीमती निशा चौधरी यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता 3 रीच्या विद्यार्थ्यांना सौ. अर्चना गिरी, सौ. संगीता साळवी व सौ. आशा कराळे यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता 4 थीच्या विद्यार्थ्यांना सौ. सविता मंगलारम्, दीपक इरोळे, मंजुषा ठोंबरे, विनोद कांडेकर यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर व सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment