नगर । प्रतिनिधी -
होमिओपॅथी जगात लोकप्रिय असलेली सर्वमान्य उपचार पध्दती आहे. या उपचारांतून आजार तर बरा होतोच याशिवाय निरोगी जीवनशैलीचाही मंत्र मिळतो. नगरमध्ये डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिक अशीच निरोगी व आनंदी जीवनशैली सर्वांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न मागील पंधरा वर्षांपासून करीत आहे. याचा असंख्य रूग्ण लाभ घेत आहेत. विविध आजार तपासणी व उपचार शिबिरांच्या माध्यमातून या क्लिनिकने हाती घेतलेले कार्य खर्या अर्थाने वैद्यकीय पेशाचाही सन्मान वाढविणारे आहे, असे प्रतिपादन सी.ए.असोसिएशनचे अध्यक्ष सीए डॉ.परेश गांधी यांनी केले.
नगरमध्ये गेल्या दीड दशकापासून होमिओपॅथी उपचार सर्वांना उपलब्ध करून अनेक रुग्णांना व्याधीमुक्त करणार्या सारसनगर येथील डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकच्यावतीने सारसनगरमध्ये विविध आजारांवर होमिओपॅथी उपचारांची विशेष शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांचा समारोप प्रोस्टेट, हर्निया, स्पॉण्डीलायटीसीस तपासणी व उपचार शिबिराने झाला. यावेळी शिबिरासाठी सहकार्य करणारे सुनील चोरबेले यांच्यासह पलक बोरा, मनीषा चोरबेले, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा, डॉ.सचिन बोरा आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.प्रतिमा बोरा यांनी सांगितले की, 1 ते 13 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या या शिबिरांचा जवळपास 352 रूग्णांनी लाभ घेतला. विना इंजेक्शन, विना शस्त्रक्रिया परिणामकारक व दुष्परिणाम विरहीत उपचार होमिओपॅथीचे वैशिष्ट्य आहे. या शिबिरांमध्ये मूळव्याध, त्वचारोग, श्वसन समस्या, महिलांचे आजार, किडनी समस्या, केसांच्या समस्या, पोटाच्या समस्या, हाडांचे आजार, मानसिक समस्या, प्रोस्टेट हर्निया, स्पॉण्डीलायटीस अशा अनेक आजारांसह विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच मतिमंद, गतीमंद मुलांच्या संबंधित समस्यांवर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. प्रत्येक शिबिराला रूग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
वेळोवेळी अशी शिबिरे घेवून या अतिशय उपयुक्त उपचार पध्दतीचा लाभ जास्तीत जास्त रूग्णांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. डॉ.बोरा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सर रूग्णांवरही विना शस्त्रक्रिया व विना इंजेक्शन उपचारांची सुविधा आहे. कॅन्सर रूग्णांना वेदनामुक्त व आनंदी जीवन जगता यावे यासाठी होमिओपॅथी पध्दतीने त्यांच्यावर उपचार केले जातात. त्याचाही लाभ अनेक रूग्णांना होत आहे, असेही त्या म्हणाल्या. डॉ.सचिन बोरा यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment