नगर । प्रतिनिधी -
सावेडी उपनगरातील शिलाविहार येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात आज (दि. 13) रोजी दुपारी 12 वा. श्रीरामनवमी जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत येथे नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. सुंदरदास रिंगणे, रेखा रिंगणे यांनी रामभक्तांकडून नामजप करून घेतला. रामनवमीला ब्रह्मचैतन्य सेवाभावी मंडळाने भजन सादर केले. दुपारी 12 वा. श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला. महिलांनी पाळणा गीते सादर केली. भाविकांनी श्रीराम जयघोषाने परिसर दुमदुमला होता. जन्मोत्सवानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला.
श्रीराम चौकात श्रीरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रामनवमी साजरी करण्यात आली. यावेळी दिलीप गाडे, दिनेश कुलकर्णी, प्रवीण घुंगार्डे, पवार मामा, रमेश संत, संदीप रासकर, नाना गायकवाड, आण्णा चांदकोटी, संजय कर्डिले व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment