नगर । प्रतिनिधी -
मनपाच्या केडगाव येथील महानगरपालिका ओंकारनगर शाळा एक दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे. शाळेने आय. एस. ओ. मानांकन मिळवत अभिमानास्पद काम केले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात स्वत:चे शैक्षणिक अॅप तयार करत एक क्रांतिकारी पाउल टाकले आहे, असे प्रतिपादन मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी केले.
मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते या मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशासनाधिकारी जुबेर पठाण, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दादासाहेब नरवडे, विषयतज्ञ अरूण पालवे, मुख्याध्यापक भाउसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता काळे,उपाध्यक्ष रवींद्र पानसरे, राजू देसाई आदी उपस्थित होते.
ओंकारनगर शाळेत विविध उपक्रम राबवत शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. शाळेने स्वत:चे शैक्षणिक मोबाईल अॅप तयार करत एक ऐतिहासिक क्षण निर्माण केला आहे, असे प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना मोबाईलशी खेळता खेळता विविध ज्ञान मिळवता यावे, पालकांना विद्यार्थ्यांचा रोजचा गृहपाठ, संदेश, शालेय उपक्रम या मोबाईल अॅपव्दारे सहज पाहता येणार असल्याचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले.
यावेळी प्रवीण मुळे, सुनील सूर्यवंशी, शीतल शेंदुरकर, गणेश शेंदुरकर, संदीप शिंदे, छगन ठोकळ, शीतल उल्हारे, कोमल लोखंडे, मीरा जवणे, सविता लोखंडे, रवींद्र खोडके, हमजा खान आदी पालक उपस्थित होते.
विषयतज्ञ अरूण पालवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर दादासाहेब नरवडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment