Monday, 15 April 2019

स्वस्तिक बसस्थानकावरील विक्रेत्यांना टोप्या


नगर । प्रतिनिधी -
आय लव्ह नगर संस्थेच्या वतीने नगरमधील स्वस्तिक बसस्थानकावरील पदार्थ विक्रेत्यांना मनपा वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य व प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे यांच्या हस्ते उन्हापासून संरक्षण होण्यासाठी टोप्या वाटण्यात आल्या. यावेळी आय लव्ह नगरची टीम उपस्थित होती
कांबळे यांनी नुकतेच नगरमध्ये सध्या दुपारी कडक उन्हामुळे रस्ते ओस पडतात. उष्णतेचा पारा 40 च्या पुढे गेला. मात्र नगरमधील स्वस्तिक बसस्थानकात अशा कडक उन्हात मुले बसभोवती पदार्थ, पाणी विक्रीसाठी गर्दी करतात. पोटासाठी दिवसभर त्यांची ही धडपड चाललेली असते. याकडे लक्ष वेधले होते. यामध्ये अनेक मुलांच्या डोक्यावर  टोपी नव्हती म्हणून  आय लव्ह नगरच्या वतीने त्यांना टोपी देण्यात आली.
विक्रेत्यांनी बसस्थानक आवारात भिंतीच्या कडेने वृक्षारोपण करावे म्हणजे सावली मिळेल, असे सांगण्यात आले. विक्रेत्यांनी आय लव्ह नगरचे नरेंद्र फिरोदिया यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment