Friday, 19 April 2019

कलारंग ड्रॉईंग अ‍ॅकॅडमीच्यावतीने 26 पासून रांगोळी शिबिर


नगर । प्रतिनिधी -
येथील कलारंग ड्रॉईंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने दि. 26, 27 व 28 एप्रिल रोजी तीनदिवसीय पोट्रेट रांगोळी आणि थ्रिडी रांगोळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कमलाबाई नवले हॉल, गुलमोहोर रोड, आम्रपाली मंगल कार्यालयाशेजारी, सावेडी, अहमदनगर येथे  सकाळी 9 ते 4 यावेळेत होणार आहे.
आपल्या अंगात कला-गुण असतात, मात्र ते बाहेर पडत नाही. मात्र माणूस चित्र अथवा रांगोळी काढण्यासाठी नेहमीच घाबरत असतो. कारण जर चित्र अथवा रांगोळी चुकली तर लोक आपल्यावर हसतील असा न्यूनगंड मनात असतो. त्यामुळे माणूस नेहमीच या दोन गोष्टींपासून दूर राहणे पसंत करतो. या शिबिरामध्ये आत्मविश्वास देण्याचे काम आणि त्याच्या हातून चांगले चित्र व रांगोळी काढण्याचे काम केले जाणार आहे.
तरी चित्र व रांगोळी काढण्याची आवड असणार्‍या कोणत्याही वयोगटातील इच्छुकांनी या शिबिरात भाग घ्यावा, असे आवाहन शिबिराच्या संयोजिका सुजता औटी-पायमोडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो.9850177042 या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment