नगर । प्रतिनिधी -
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्रत्येकाच्याच अंगाची लाहीलाही होत आहे. पाण्यावाचून पशु-पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या जात आहे. पक्ष्यांची एकूणच संख्या कमी झाली असून, त्यांचे जीवन वाचवायचे असेल, तर घराच्या गॅलरी, व्हरांडा, खिडकी, गच्चीवर आदी ठिकाणी त्यांना पिण्यासाठी पाणी भरून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी स्कूलने विद्यार्थ्यांना विविध आकाराची मातीची भांडी दिली आहेत. या माध्यमातून तुम्हीही जगा व इतरांना जगू द्या, पशु-पक्ष्यांना जीवनदान द्या, हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यामुळे पक्ष्यांची तहान भागणार आहे, असे प्रतिपादन सिंधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गिरीधारीलाल मध्यान यांनी केले.
सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पशु-पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवता येईल, अशी विविध प्रकारची मातीची भांडी संस्थेचे अध्यक्ष गिरीधारीलाल मध्यान व सेक्रेटरी दामोधर बठेजा यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी विश्वस्त रूपचंद मोटवाणी, प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका गोदावरी किर्तानी, उपप्राचार्या कांचन पापडेजा, वर्षा बठेजा, रितिका काबरा, लहेर बठेजा आदी उपस्थित होते.ं
सेक्रेटरी दामोधर बठेजा म्हणाले की, स्कूलने नेहमीच नवनवीन उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमधील सामाजिक भावना जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या आसपास घडणार्या घटनांबाबत विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामुळे प्रत्येकालाच त्रास सहन करावा लागत आहे. मातीच्या भांड्यात प्रत्येक विद्यार्थ्यांने दररोज पाणी टाकावे, असे सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्या गीता तांबे यांनी केले. सूत्रसंचालन आशा रंगलानी यांनी केले, तर आभार तसलीम हकीमजीवाला यांनी मानले.
No comments:
Post a Comment