Saturday, 13 April 2019

श्रीरामनवमीनिमित्त पवननगरमध्ये पालखी मिरवणूक


नगर । प्रतिनिधी -
 पवननगर येथील श्रीराम हनुमान मंदिरातील प्रभू श्रीरामाच्या उत्सव मूर्तीची पालखी  मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
श्रीराम मंदिरात पूजा करून फुलांनी सजवलेली पालखी घेऊन श्रीराम सेवा समितीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांच्या निवासस्थानी आली. तेथे श्रीरामाच्या उत्सव मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. तेथून ही पालखी प्रशांत भालेराव यांनी खांद्यावर घेऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला. ‘प्रभू श्रीराम चंद्र की जय’, ‘श्रीराम जयराम जय जय राम’, ‘रघुपती राघव राजाराम’ अशा अभंग गायनाने श्रीरामाचा जयघोष करीत तुतारीच्या निनादात, टाळ-मृदंगाच्या साथीने भक्तिगीते व अभंग म्हणत ही पालखी मिरवणूक पुढे निघाली. पवननगर, गोकुळनगर, साईराम नगर, कुशबा नगरी, तुळजानगर, नंदनवन नगर मार्गे ही पालखी पुन्हा श्रीराम मंदिरात पोहचली.
पालखी मिरवणूक मार्गावर परिसरातील महिलांनी रस्त्याच्या दुतर्फा सडासंमार्जन करून आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. मिरवणूक मार्गावर आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. प्रभू श्रीरामाच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
या मिरवणुकीत बँड पथक, तुतारीवादक, भालदार-चोपदार, अब्दागिरी, छत्री, भगवे ध्वज, टाळ-मृदंग पथक, भजनी मंडळ या लवाजम्यासह  ह.भ.प. संदीप महाराज खोसे, ज्ञानदेव दारकुंडे, राजन पोहेकर, संतोष कुलकर्णी, चंद्रकांत दगडे, शिरीष कुलकर्णी, रमेश म्हस्के, नंदकुमार कुलकर्णी, विश्वासराव देशमुख, आदिनाथ सामृत, संजय टेके, दत्तू सुरसे, अजय भालेराव, शहाजी कदम, विजय भंडारी, शांतीलाल मुनोत, विश्वास देशमुख, शिरीष कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, नकुल दायमा, अनिल दूतारे, विनय तिवारी, सारंग तरडे यांच्यासह श्रीराम सेवा भजनी मंडळ, महिला भजनी मंडळे व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment