नगर । प्रतिनिधी -
समाजातील दुर्बल घटकांची विविध मार्गाने सेवाभावी कार्य करणार्या महावीर इंटरनॅशनल या संस्थेने 45 वर्षांत देश-विदेशात लौकिक प्राप्त केला व आज भगवान महावीर स्वामीजींच्या जन्मदिनी शिरुर (जि. पुणे) येथे सुनील बाफना व समीक्षा बाफना यांच्या प्रेरणेने वीर आणि वीरा केंद्राचे पदग्रहण होत आहे. त्यानिमित्त महावीरांना अपेक्षित असलेले सेवाभावी कार्य म्हणून या सदस्यांनी पुणे येथील नामांकित 15 डॉक्टर व हार्डीकर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने 400 रुग्णांची तपासणी करुन पुण्य कमावले, हे अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना यांनी केले.
बाफना यांच्या हस्ते वीर-वीरा सदस्यांचा शपथविधी पार पडला, यावेळी ते बोलत होते. झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा व वीरा माजी अध्यक्षा बरमेचा यांनी वीरांना शपथ दिली. नवकार मंत्र, महावीरांची प्रार्थनानंतर सर्व ज्ञात-अज्ञात मृतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सेक्रेटरी सुदर्शन दुगड यांनी उपस्थितांचे स्वागत करुन महावीर इंटरनॅशनल या संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
नगरच्या वीरा केंद्र अध्यक्षा उज्ज्वला बोथरा यांनी महावीर चिन्हाने वीर-वीरांना सन्मानित करुन शुभेच्छा दिल्या. शिरुर केंद्राचे अध्यक्ष सुनील बाफना यांनी महाआरोग्य शिबिरास सहकार्य करणार्या डॉ. हर्डीकर व त्यांच्या सदस्यांचे आभार मानले व 400 हून अधिक रुग्ण आप्तांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. वीरा केंद्राच्या नूतन अध्यक्षा समीक्षा बाफना व सचिव सपना दुगड यांनी शिरुर शहरात महिला व युवतींसाठी भरीव सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला. उपाध्यक्ष अभय चोरडीया यांनी शिरुर केंद्राच्या नियोजित उपक्रमांचा आढावा सादर केला व शिरुरच्या समाजबांधवांचे सर्व उपक्रमांना सहकार्य लाभेल, असा विश्वास व्यक्त केला.
सुप्रिका दुगड हिने या उपक्रमास उत्कृष्ट सहकार्य केल्याबद्दल संघपति शांतीलालजी कोठारी यांनी तिचा सत्कार केला. लवकरच आपण शिरुर शहरात युवती केंद्र सुरु करु असे सुप्रिका हिने जाहीर केले व त्यास उपस्थित सर्व युवतींनी प्रतिसाद दिला. संघपति शांतीलाल कोठारी यांनी आपल्या भाषणात महावीर इंटरनॅशनलचे कार्याबद्दल समाधान व्यक्त केले व या केंद्राद्वारे शिरुर येथे भरीव कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास नगर केंद्राचे माजी अध्यक्ष महेंद्र लोढा, उपाध्यक्ष रमेशचंद्र बाफना, झोन चेअरमन गौतमलाल बरमेचा, संचालक मनोज शेटिया, माणकचंद कटारिया, राजेंद्र बोथरा, सुवालाल ललवाणी, श्रेणिक नहार व वीरा केंद्राच्या उपाध्यक्षा निर्मल बाफना, माजी अध्यक्षा सरला बरमेचा, अध्यक्षा उज्ज्वला बोथरा, वैशाली शेटिया, मंजुषा ललवाणी, सजनबाई कटारिया व सचिव सुरेखा संचेती, शोभा लोढा आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांतीलाल बाफना, चोरडिया, दुगड आदी परिवार व शिरुरचे बंधू-भगिनी उपस्थित होते. वैभव गादिया यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment