Monday, 15 April 2019

व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांत अवश्य सहभाग घ्यावा ः मध्यान


नगर । प्रतिनिधी -
सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये रामचंद बठेजा यांच्या स्मरणार्थ स्टोरी टेलिंग, निबंध, कविता वाचन, हस्ताक्षर आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्कूलमधील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना टिकमचंद बठेजा परिवाराच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल मध्यान यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी सेक्रेटरी दामोधर बठेजा, विश्वस्त रूपचंद मोटवाणी, प्राचार्या गीता तांबे, मुख्याध्यापिका गोदावरी कीर्तानी, उपप्राचार्या कांचन पापडेजा, वर्षा बठेजा, लहेर बठेजा, रितिका काबरा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल मध्यान म्हणाले की, सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या सर्व स्पर्धांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, यासाठी शिक्षक-शिक्षिका प्रयत्न करतात. सर्वांगीण व व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्पर्धा आवश्यक असून, यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
सेक्रेटरी दामोधर बठेजा म्हणाले की, स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा या कै. रामचंद बठेजा यांच्या स्मरणार्थ घेण्यात आल्या असून, या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना टिकमचंद बठेजा परिवाराच्या वतीने विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या सर्वच स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात प्राचार्या गीता तांबे म्हणाल्या की, विद्यार्थी-विद्यार्थिंनींच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असतो. स्पर्धा या त्याचाच एक भाग आहेत. आज ज्या मुलांना यश मिळाले, त्यांनी यशाने हुरळून जाऊ नये व ज्यांना यश मिळाले नाही, त्यांनी खचू नये. पुन्हा नव्या जोमाने तयारी करावी. यश मिळण्यासाठी तुमच्याकडे कष्ट उपसण्याची तयारी असावी लागते, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन तसलीम हकीमजीवाला यांनी केले, तर आभार आशा रंगलानी यांनी मानले.

No comments:

Post a Comment