Thursday, 11 April 2019

रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


नगर । प्रतिनिधी -
भिस्तबाग महाल रस्त्यावरील पवननगर येथील श्रीराम हनुमान मंदिरात श्रीराम सेवा समितीच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त शुक्रवार दिनांक 12 व शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीराम सेवा समितीचे अध्यक्ष प्रशांत भालेराव यांनी दिली.
शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता पवननगर येथील श्रीराम मंदिरापासून श्रीराम उत्सवमूर्तीची पालखी काढण्यात येणार आहे. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये प्रभू श्रीरामाची उत्सव मूर्ती, पादुका व रामायण ग्रंथ ठेवून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.त्यामध्ये तुतारी, तुतारी वादक, भालदार चोपदार, अब्दागिरी, छत्रधारी, हातात भगव्या पताका घेतलेले वारकरी दिंडी पथक, वीणा, टाळ-मृदंग पथक, परिसरातील भाविक भक्त व महिला सहभागी होणार आहेत.
शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता श्री. व सौ.सुभाष शर्मा यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाचा महाभिषेक होणार आहे. सकाळी 10 वाजता श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प.गुरुभक्त संदीप महाराज खोसे यांचे कीर्तन होणार आहे. त्यांना मृदंगाचार्य, टाळकरी, गायक व सहकारी भक्तगण साथ देणार आहेत. श्रीमहालक्ष्मी, श्री सीतामाई, विठ्ठल-रुक्मिणी व श्री स्वरदायिनि महिला भजनी मंडळ सहभागी होणार आहे.
दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामचंद्र जन्म, अभंग व जन्मसोहळा होणार आहे. दुपारी12.30 वाजता उपस्थित महिला मंडळाचे टिपरी नृत्य, पाळणा, औक्षण व आरती होणार आहे. दुपारी 1 ते 4 महाप्रसाद होणार आहे.

No comments:

Post a Comment