नगर । प्रतिनिधी -
पूज्य विदुषी गुरूमैय्या मधुलताश्रीजी महाराज यांच्या सुशिष्या, श्रीमणिभद्रवीर उपासिका, महामांगलिक प्रभाविका, संघ समन्वय साधिका पूज्य कैवल्यरत्नाश्रीजी महाराज दि.11 एप्रिल रोजी नगरमध्ये येत असून सी.ए.रमेश फिरोदिया यांच्या निवासस्थानी भाविकांना त्यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. यादिवशी सकाळी 9 ते 12 व दुपारी 3 ते रात्री 9 यावेळेत त्यांच्या दर्शनाची लाभ मिळणार आहे. सी.ए.रमेश फिरोदिया यांच्या मुनोत इस्टेट, सक्कर चौक येथील निवासस्थानी त्या विराजमान असतील.
पूज्य कैवल्यरत्नाश्रीजी महाराज यांनी मागील वर्षी गुढीपाडव्याला नगरमध्ये रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे महामांगलिक कार्यक्रम घेतला होता. त्यांच्या सान्निध्यात हजारो भाविकांनी एकाच वेळी अध्यात्मिक शांती आणि शुध्द विचारांची अनुभूती घेतली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व मंगल कैवल्यम् रिलिजियस ट्रस्टतर्फे नगर-शिर्डी महामार्गावरील कोल्हार भगवतीमध्ये भव्य कैवल्यधाम तीर्थ उभारण्यात आले आहे. या कार्यातही सी.ए.रमेश फिरोदिया यांनी भरीव योगदान देवून कार्यास हातभार लावला आहे. या महान साध्वीजींचे प्रत्यक्ष दर्शन व कृपाशिर्वाद मिळवण्याची संधी भाविकांना प्राप्त झाली आहे. याचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सी.ए.रमेश फिरोदिया व सौ.सविता रमेश फिरोदिया यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment