नगर । प्रतिनिधी -
शहरात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, तापमान 40 अंशांच्या घरात जात असल्याने नगरकरांच्या जीवाची काहिली होत आहे.
गेल्या दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर उन्हाचा पारा पुन्हा वाढला आहे. तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तीन दिवस उन्हाची तीव्रता जाणवली नाही. शहरात सध्या राजकीय वातावरण जसे जसे तापत गेले तसाच उन्हाचा जोरही वाढत गेला असल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिना सुरु झाला तशी तापमानात वाढ होण्यास सुरवात झाली. वातावरणातील बदलामुळे तापमान कमी-अधिक होत राहिले. गेल्या आठवड्यापासून शहरातील तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. तापमानात वाढ झाल्याने उकाडाही वाढला आहे. दुपारच्या वेळेस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नगरकर घराबाहेर पडणे टाळत आहेत. रविवारी सुटीचा दिवस असूनही शहरातील रस्त्यावर दुपारी सामसूम दिसत होती. दिवसभराचा उकाडा व त्यात भारनियमनाचा त्रासही सहन करावा लागत आहे.
No comments:
Post a Comment