नगर । प्रतिनिधी -
भीमक्रांती प्रतिष्ठानतर्फे क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सुखसागर कॉलनी, वाणीनगर पाईपलाईन रोड येथे करण्यात आले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी पाईपलाईन रोड परिसरातील सर्व बंधूभगिनींना व लहानथोरातांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व बांधवांनी या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन भीमक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. महेश देठे, सर्वश्री. अनिल ठोेकळ, उत्तम पवार, सुनील मोकळ, मोरेसर, बोर्डे, राजेंद्र थोरात, संजय जाधव, सोमा शिंदे, विनोद साळवे, सचिन मोकळ आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment