नगर । प्रतिनिधी -
येथील सप्तसूर फाऊंडेशनच्या वतीने गदिमा व बाबूजी उर्फ सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून श्रीराम नवमीनिमित्त शनिवार दि.13 एप्रिल रोजी माऊली सभागृहात संध्या. 6 वा. नगरकरांसाठी गीतरामायण कार्यक्रम रंगणार आहे. सप्तसुरांनी सजलेल्या गीतरामायणातील निवडक गीतांचा सुमधूर कार्यक्रम नगरकरांसाठी मोफत ठेवण्यात आला असून, कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन फाऊंडेशनचे सचिव डॉ. राजीव सूर्यवंशी यांनी केले आहे.
सप्तसूर फाऊंडेशनचे गुणी कलावंत डॉ.विलास जोशी, डॉ.योगीनी वाळिंबे, रेखा जोशी, डॉ.स्मिता केतकर, डॉ.शिरीष कुलकर्णी, डॉ.रोहिणी काळे, डॉ.अविनाश वारे, डॉ.बाळासाहेब देवकर आणि डॉ.सचिन पानपाटील हे कलाकार गीत रामायणातील निवडक गाणी रसिकांसाठी सादर करणार आहेत. सुमारे 20 निवडक गाण्यांचा हा सुश्राव्य कार्यक्रम आहे.
कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका डॉ.जोशी हॉस्पिटल केडगाव, डॉ.जोशी हॉस्पिटल गुलमोहर रोड, डॉ.विजय पाटील हॉस्पिटल कोठी स्टेशन रोड, मातृसेवा हॉस्पिटल टिळक रोड, फिनिक्स स्कीन हेअर लेझर क्लिनिक मनमाड रोड, डॉ.अविनाश वारे क्लिनिक चौपाटी कारंजा, डॉ.केतकर क्लिनिक पाईपलाईन रोड व डॉ. वाळिंबे हॉस्पिटल बंगाल चौकी येथून उपलब्ध होणार आहेत. प्रथम येणार्यास आसनासाठी प्राधान्य दिले जाणार असून, काही प्रवेशिका सभागृहावर कार्यक्रमाच्या दिवशी उपलब्ध असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
No comments:
Post a Comment