नगर । प्रतिनिधी -
संत निरंकारी मंडळाच्या झोन क्र.36 अ च्या सेवादलच्या क्षेत्रीय संचालकपदी आनंद कृष्णानी यांची निवड झाली असून नुकतेच मिस्कीन रोडस्थित निरंकारी सत्संग भवन येथे आयोजित अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमात दिल्ली निवासी, ओमप्रकाश निरंकारी (सेवादल, उपमुख्य संचालक) यांच्या हस्ते कृष्णानी यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी एस.के.जुनेजा (दिल्ली), अहमदनगर क्षेत्राचे विभागीय प्रमुख (36 अ) हरीश खुबचंदानी, नंदकुमार झांबरे ( झोनल इंचार्ज, सातारा) औरंगाबाद क्षेत्राचे विभागीय प्रमुख कन्हैयालाल डेबरा, औरंगाबाद सेवादल क्षेत्रीय संचालक हरीलाल नाथानी, प्रफुल्ल मांडवकर (क्षेत्रीय संचालक, नाशिक), मुंबई क्षेत्र क्र.3 चे सेवादल क्षेत्रीय संचालक ललीत कुमार दळवी, मुंबई क्षेत्र क्र.6 चे सेवादल क्षेत्रीय संचालक अरुण पाटील तसेच मोठ्या संख्येने झोन क्र.36 अ च्या अनेक शाखांचे मुखी, प्रमुख, संयोजक आदी अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद कृष्णानी यांनी सांगितले की, निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षाजींच्या कृपाशिर्वादाने ही सेवा प्राप्त झाली आहे. गेली 27 वर्षे अहमदनगर ब्रांचच्या निरंकारी सेवादल संचालकपदी जबाबदारी पार पाडल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा तसेच हिंगोली, परभणी, नांदेड, बीड या पाच जिल्ह्यातील सेवादलच्या क्षेत्रीय संचालकपदी झालेली निवड सार्थ ठरावी यासाठी सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन पूर्वीप्रमाणे मिळत राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली. विभाग क्र.36 अ मधील संपूर्ण सेवादल शिस्तबद्ध, प्रशिक्षित व सेवावृत्ती भावाने परिपूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
आनंद कृष्णानी निरंकारी मंडळाच्या कार्यासोबतच अनेक सामाजिक कार्य करण्यात सतत अग्रेसर असतात. सिंधु नागरी पतसंस्थेचे संचालक तसेच सिंधी सोशल संस्थाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. च्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment