नगर । प्रतिनिधी -
सध्या महाग होत चाललेली आरेाग्य सेवा ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे व्यक्ती हा काटकसर करुन छोटे-मोठे अथवा घरगुती उपचार करतोे. त्यामुळे व्याधी वाढत जाते. त्यासाठी समाजातील संघटनांनी व डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपून मोफत शिबिरांच्या माध्यमातून गरजूंवर उपचार करणे आवश्यक झाले आहे. संत-महंत व राष्ट्रपुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी दिनी आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन समाजाला दिलासा देण्याची गरज आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीने ग्रामीण भागाची अवस्था भयानक झाली आहे. अशा परिस्थितीत संत सावता माळी युवक संघ मोफत दंतरोग तपासणी शिबिर घेऊन राष्ट्रपुरुषांप्रती आदरभाव व्यक्त करत युवकांना दिशा देण्याचे काम करत आहे, असे प्रतिपादन तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांनी केले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सवानिमित्त संत सावता माळी युवक संघ व डॉ.गोरे डेंटल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वांबोरी येथे आयोजित मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी डॉ.सुदर्शन गोरे, संघाचे संस्थापक सचिन गुलदगड, सरपंच निशाताई व्यास, उपसरपंच राजेंद्र पठारे, परेश व्यास, तालुकाध्यक्ष अशोकराव तुपे, शहराध्यक्ष दीपक साखरे, सुनील शिंदे, भरत सत्रे, अनिमिष व्यवहारे, सोमनाथ कुर्हे, संकेत राऊत, दीपक पुंड, गोरक्षनाथ सत्रे, महिला आघाडीच्या जयश्री व्यवहारे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड म्हणाले, श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व पुण्यतिथी ही सामाजिक उपक्रम राबवून साजरी केली जाते. महात्मा ज्योतीबा फुले यांना अपेक्षित असलेले कार्य हे युवक संघाच्यावतीने सुरु असून संघाच्या या चांगल्या कामामुळेच अनेक युवक संघाशी जोडले जात आहेत. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. गुलदगड यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. सुदर्शन गोरे म्हणाले, राष्ट्रपुरुषांनी दाखविलेल्या समाज उन्नत्तीच्या कार्यासाठी श्री संत सावता माळी युवक संघात आपले योगदान देत आहेत. या माध्यमातून सुरु असलेल्या दंतरोग तपासणी शिबिरामुळे गरजूंवर मोफत तपासणी होऊन उपचार होत आहे ही चांगली बाब आहे. आज दिवसेंदिवस लहानांपासून-मोठ्यांपर्यंत दाताच्या समस्या निर्माण होत आहेत. यावर वेळीच उपचार केल्यास आपले दात निरोगी व मजबूत राहण्यास मदत होईल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दातांची नियमित तपासणी करुन काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन केले.
यावेळी अशोकराव तुपे म्हणाले, संत सावता माळी युवक संघाच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक कार्य केले जात आहे. सामाजिक उपक्रमांमुळे संघाचे कार्य वाढत आहे, त्यामुळे संघाच्या कार्यात अनेकजण सहभागी होत आहेत. महात्मा फुले यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम संघाच्या मार्फत सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्षनाथ सत्रे यांनी केले. तर आभार दीपक साखरे यांनी मानले. याप्रसंगी सुनील शिंदे, सूरज सत्रे, रितेश सत्रे, अनिल शिंदे, भारत सत्रे, संतोष शिंदे, गोरख पुंड, आशितोष नवले, तुषार राऊत, सोमेश्वर नेवासकर, मुकेश पटेकर, आदेश सत्रे, अजय सोळंकी, शिवाजी पुंड, पप्पू विधाते, कानिफनाथ सत्रे, मधुकर चव्हाण आदींसह नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment