नगर । प्रतिनिधी -
नगर शहरामध्ये प्रथमच एअर रायफल/एअर पिस्तोल शुटींग रेंजचे उद्घाटन दि. 14 रोजी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ तुरुंगाधिकारी शेंगडे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी स्वतः एअर रायफल/ एअर पिस्तोल शुटींगचा अनुभव घेतला. तसेच त्यांनी या शुटींग रेंजमुळे अनेक मुलांना स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल व शुटींग करीअरमध्ये नावलौकिक करण्याची संधी उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी शहरातील अनेक मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमास प्रसाद कुलकर्णी, राजकमल कोहली, जयहिंद सैनिक सेवा फौंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, संजय पाटेकर, अश्पाक शेख, जगदीश चौधरी, सरिता कदम, ऑनररी लेफ्टनंट अशोक वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे संचालक/ कोच सागर वाबळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
No comments:
Post a Comment