Thursday, 18 April 2019

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘शंभर टक्के मतदान घडवा, लाख रुपये बक्षीस मिळवा’ स्पर्धा


नगर । प्रतिनिधी -
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेत सर्व नागरिकांचा सहभाग आवश्यक असून, गावा-गावात शंभर टक्के मतदान होण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनने मतदार जागृती उपक्रमांतर्गत शंभर टक्के मतदान घडवा, लाख रुपये बक्षीस मिळवा स्पर्धा जाहीर केल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी दिली.
लोकशाहीत मतदानाला महत्त्व असून, कमी मतदान झाल्याने योग्य उमेदवार निवडला जात नाही. कमी मतदान हे लोकशाहीला मारक असून, शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून गावपातळीवर जागृती चालू आहे. नुकतेच नागरदेवळे (ता.नगर) येथील ग्रामस्थांनी शंभर टक्के मतदान घडवून आनण्याचा संकल्प केला आहे.  मतदानासारख्या राष्ट्रीय मोहिमेत सहभागी होणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. सोशल मीडियाचा वापर युवकांनी मतदार जागृतीसाठी करुन शंभर टक्के मतदान घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या गावात शंभर टक्के मतदान होणार त्या गावाच्या ग्रामपंचायतीस 1 लाख 11 हजार 111 रु. बक्षिस फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते देऊन गौरव केला जाणार असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment