नगर । प्रतिनिधी -
येथील प्रतिबिंब संस्थेच्या वतीने फोटो, मॉडेलिंग, फॅशन, व्यक्तिमत्व सौंदर्य यावर आधारित फोटोजेनिक 2019 स्पर्धा घेण्यात येणार असून तसेच विविध टायटल देण्यात येणार आहेत. त्यासाठीची ऑडिशन दि. 23 ते 25 एप्रिलला रोज दु. 3 ते संध्या. 7 पर्यंत स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर येथे होणार आहे.
नगरमध्ये मागील वर्षी साईबनमध्ये बेस्ट फेस ऑफ अहमदनगर सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर यावर्षी मास्टर/ मिस्टर/मिस /ि मसेस फोटोजेनिक 2019 स्पर्धा घेत आहोत अशी माहिती मुद्रा कांबळे यांनी दिली.
स्पर्धा पुढील गटात घेतल्या जाणार असून जेन्टस -1) 5 ते 15व योगट मास्टर फोटोजेनिक 2) 15 वर्षपुढील मिस्टर फोटोजेनिक लेडीज - 1) 5 ते 15 वयोगट लिटिल फोटोजेनिक 2) 15 ते 25 मिस फोटोजेनिक 3)25 वर्षांपुढील मिसेस फोटोजेनिक असे गट आहेत. स्पर्धेत विविध बक्षिसे व टायटल देण्यात येणार आहेत. सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
ऑडिशनमधून निवड झालेल्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी खास प्रोफेशनल ट्रेनर आहेत. तसेच त्यांचे फोटोसेशन करून पोर्टफोलिओ अल्बम बनविण्यात येणार आहेत. नंतर त्यांची फायनल स्पर्धा होणार आहे.
निवड झालेल्या मुलांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा सर्व उपक्रम मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी स्पार्कल इन्स्टिट्यूट, स्टेट बँकसमोर, दिल्लीगेट, अहमदनगर.मो. 9822118913 येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment