नगर । प्रतिनिधी -
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, अहमदनगर यांच्या वतीने 10 ते 17 वर्षे वयोगटातील मुला- मुलींसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण शिबिर दिनांक 15 एप्रिल ते 31 मे या कालावधीत होणार आहे. त्यात बॅडमिंटन, ज्युदो, कराटे, फुटबॉल, मैदानी, खो-खो, आर्चरी, बास्केटबॉल, योगा या खेळांचे प्रशिक्षण तज्ञ प्रशिक्षकांमार्फत दिले जाणार आहे.
हे शिबिर जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर येथे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यत व सायंकाळी 5 ते रात्री 7 वाजेपर्यंत होणार आहे.
शिबिरासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, अहमदनगर येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
No comments:
Post a Comment