Monday, 15 April 2019

मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचे शुक्रवारी पारितोषिक वितरण


नगर । प्रतिनिधी -
मंथन वेलफेअर फौंडेशन अहमदनगर व साप्ताहिक ज्ञानवंतच्या वतीने शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता माऊली संकुल सभागृह येथे मंथन राज्यस्तरीत प्रज्ञाशोध परीक्षा 2019 चा पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
लार्सन अँड टूब्रोचे जनरल मॅनेजर अरविंद पारगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व आय.पी.एस. अधिकारी जैब शेख, डॉ. दयानंद जगताप, यांच्या शुभहस्ते होणार्‍या पारितोषिक वितरण समारंभास प्रसिद्ध सिने अभिनेत्री तेजा देवकर, ‘तुला पाहते रे’ फेम निमकर अभिनेता मोहिनीराज गटणे, सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे, कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप गाडे, मुख्याधिकारी अजय साळवे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मंथन वेलफेअर फौंडेशनने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच भविष्यातील विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2019 चे आयोजन केले होते. त्यामध्ये राज्यभरातून गुणवत्ता यादीत 287 विद्यार्थी बक्षीस पात्र ठरले.
या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभास विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंथन वेलफेअर फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment