Saturday, 13 April 2019

आकाशवाणीच्या ‘बालमेळा’ कार्यक्रमात रविवारी सर्वज्ञा कराळेची मुलाखत


नगर । प्रतिनिधी -
आकाशवाणीच्या ‘100.1 मेघाहर्टज’ या अहमदनगर केंद्रावरून प्रसारित होणार्‍या ‘बालमेळा’ या कार्यक्रमात  बालकलाकार सर्वज्ञा अविनाश कराळे हिची मुलाखत रविवारी (दि. 14) होणार आहे.आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त नुकत्याच 58 व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रावर झालेल्या प्राथमिक फेरीत आणि सांगली येथे झालेल्या अंतिम फेरीत ‘अशुद्ध बीजापोटी’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र जाहीर झाल्याबद्दल निवेदिका वृषाली पोंदे यांनी तिची प्रकट मुलाखत घेतली आहे.  सर्वज्ञा ही सेंट विवेकानंद इंग्लिश मीडीयम स्कूलची विद्यार्थिनी  असून, ही मुलाखत रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता प्रसारित होणार आहे.

No comments:

Post a Comment