नगर । प्रतिनिधी -
डिसेंबर 2018 मध्ये जिल्हा विज्ञान अध्यापक संघातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान परिक्षांमध्ये श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला (माध्यमिक) सावेडी या शाळेत इ. 6वी या वर्गातील निसर्ग नितीन वायकर व व इयत्ता 9 वी तील वेदांत बबन दहिफळे हे विद्यार्थी तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाने यशस्वी झाले आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष ह.वा. इनामदार, उपकार्याध्यक्ष डी .आर. कुलकर्णी, शालेय समिती चेअरमन (माध्यमिक) अॅड. किशोर देशपांडे, शालेय समिती चेअरमन (प्राथमिक) सुरेश क्षीरसागर, प्राचार्या संगीता जोशी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मनीषा अंबाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment