Monday, 8 April 2019

गीत, संगीत, नृत्य, नाट्य अविष्काराने जिंकली हजारो रसिकांची मने


नगर । प्रतिनिधी -
रसिक ग्रुपच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी सायंकाळी सावेडीतील जॉगिंग पार्क मैदानावर आयोजित ‘रसिकोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमात नामवंत कलावंतांनी सादर केलेल्या मराठी चित्रपटगीत, लावणी, महाराष्ट्र गीत, गोंधळ, लोकगीत, गवळण, कव्वाली आणि पोवाडा असे एकाहून एक सरस गीत प्रकार सादर करून हजारो नगरकर रसिकांची मने जिंकली.
महाराष्ट्राचा लोकगायक नंदेश उमप, चांदणं चांदणं फेम पार्श्वगायिका भारती मढवी, सूर नवा ध्यास नवा विजेती पार्श्वगायिका स्वराली जाधव, संगीत सम्राट विजेता पार्श्वगायक रवींद्र खोमणे, सूर नवा ध्यास नवा फेम लाडका मॉनिटर हर्षद नायबळ, विनोदी कथाकार डॉ. संजय कळमकर आणि बिगबॉस फेम सिनेअभिनेत्री स्मिता गोंदकर अशा नामवंत कलावंतांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.
संगीत सम्राट विजेता गायक रवींद्र खोमणे याने गायिलेल्या ‘सूर निरागस हो’ या गणेशवंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर डॉ. देविका दामले यांनी ‘जीवलगा कधी येशील रे’ हे ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेले आणि गायक संगीतकार सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गीत सादर केले. रवींद्र खोमणे यांनी ‘सैराट झालं जी’, ‘आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरव्या रानी’ हे  गीत सादर केले. भारती मढवी हिने ‘खेळतांना रंग बाई होळीचा’ ही भन्नाट लावणी व ‘चांदणं चांदणं झाली रात’, ‘वाट माझी बघतोय रिक्षा वाला’ ही लोकप्रिय गाणी सादर केली. व्हिक्टर डान्स अकॅडमीच्या कलावंतांनी आय लव नगर या अ‍ॅथम साँगवर नृत्य सादर केले. सायली बोपर्डीकर व सहकार्‍यांनी गणेश वंदनेवर भरतनाट्यम् नृत्य सादर केले. नगरच्या वैष्णवी काळे हिने ‘आता वाजले की बारा’ हे लावणी नृत्य सादर केले.
‘सूर नवा ध्यास नवा’ फेम मॉनिटर हर्षद नायबळ याने ‘एक पोरगी संध्याकाळी नाक्या वरती पाहिली होती’, ‘डिप्पाडी डिप्पांग’ ही गाणी सादर केली. तर चैतन्य देवढे याने ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’, ‘माझी मैना गावावर राहिली’ ही गाणी सादर केली. राजगायिका स्वराली जाधव हिने ‘फड सांभाळ तुर्‍याला ग आला’ ही लावणी व ‘दमा दम मस्त कलंदर’ ही कव्वाली सादर केली. बिगबॉस फेम सिने अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने ‘पप्पी दे पप्पी दे पारूला’, ‘झिंगलय झिंगलय रे, ‘तुझी चिमणी उडाली भुर्रर्र’ या गाण्यावर दिलखेचक नृत्य सादर केले. महाराष्ट्राचा लोकगायक नंदेश उमप यांनी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत, ‘मल्हार वारी मोतीआणी द्यावी भरून’, ‘आम्ही अंबेचे गोंधळी’, हा गोंधळ व ‘महाराजांची कीर्ती बेफाम’ हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीच्या प्रसंगाचे वर्णन करणारा पोवाडा सादर करून या संगीत मैफलीत प्राण ओतले.  झी मराठी हास्यसम्राट फेम विनोदी कथाकथनकार डॉ. संजय कळमकर यांनी विनोदी किस्से कथन करून प्रेक्षकांना मनमुराद हसविले.
सिने अभिनेत्री समीरा गुजर व स्वप्नील रास्ते यांनी या संगीत मैफलीचे निवेदन केले. या कलावंतांना केदार परांजपे, सुभाष देशपांडे (किबोर्ड), सन्मित वाघमारे (गिटार), विनोद वाव्हळ (ऑक्टोपॅड), समीर बंकापुरे (तबला), नागेश भोसेकर (ढोलक-ढोलकी), यांनी संगीत साथ दिली. अनुदीप जाधव, राजेश वळंजू व संतोष शिर्के यांनी स्वरसाथ केली.
मान्यवरांच्या हस्ते व सर्व प्रायोजकांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ‘आय लव नगर’ या अ‍ॅपचे शानदार उद्घाटन झाले.
यावेळी ’आय लव नगर’चे नरेंद्र फिरोदिया, कोहिनूरचे प्रदीप गांधी, एस.जी. कायगावकर ज्वेलर्सचे सुभाष कायगावकर, पारस पाईप्स व फिटिंग्जचे पेमराज बोथरा, क्रॉम्प्टन ग्रीव्हज्चे संदीप तांबोळी, अजय पांढरीपांडे, जी.सी.एम. चे गौतम मुनोत, मेघना मुनोत, इंदिराबाई मुनोत, एल.आय.सी. चे वरीष्ठ अधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, सुनील पवार, तेज इंडस्ट्रीज व माणिकप्रेम इंडस्ट्रीजचे प्रसन्न मुथा, क्लासिक व्हील्सचे सुनील मुनोत, सुमेश मुनोत, सनफार्माचे गिरीश भुंजे, कैलास गुरव, क्रिश एंटरप्राइजेसचे संतोष झावरे, आदित्य झावरे, रेमंड (सावेडी)चे निहार भरणे, सिद्धी लॉन्सचे वाघमोडे, टिपुगडे, भिंगारे, विश्वास रोड लाईन्सचे बाळासाहेब विश्वासराव, रमेश फिरोदिया कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे रमेश फिरोदिया, हुंडेकरी मोटर्सचे वसीमभाई हुंडेकरी, काऊ कार्टचे जितेंद्र बिहाणी, कायनेटिक इंजिनिअरिंगचे शशिकांत गुळवे, साई सूर्य नेत्र सेवाचे डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, शबरी इंडस्ट्रीअल केटरिंगचे के.के.शेट्टी, गजराज ड्रायक्लिनर्सचे सुरेश चव्हाण, श्री ट्रॅव्हल्सचे कुमार बेलसरे, उदय दरंदले, आर.एस. इंजिनिअर्सचे राजेंद्र कटारिया, टेक्नो ट्रॅकचे अशोक सोनवणे, अरुण कुलकर्णी, हाय टेक इंजिनिअर्सचे प्रवीण बजाज, एस. कॉम्पोनन्टस्चे किरण कथडे, सुयश मेटलचे अभय मेस्त्री, निर्मल इंडस्ट्रीजचे हरीश अलग, अविहास इलेक्ट्रिकल्सचे अविनाश बोपर्डीकर, मिलिंद गंधे, चारुहास मुळे, श्रीजी इंजिनिअर्सचे अग्रवाल, स्वीट होमचे धनेश बोगावत, आनंद बोगावत, विशाल इंडस्ट्रीजचे गणेशजी, साई टेक कार्पोरेशनचे अक्षय नरसाळे, हॉटेल गुलमोहर प्राईडचे झोयेब खान, आय. एम. खान, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे वसंत लोढा, विकास पाथरकर आदींचा रसिक ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आंला.जयंत येलुलकर यांनी स्वागत केले. नरेंद्र फिरोदिया यांनी प्रास्ताविक केले. उद्धव काळापहाड, विनिता चोप्रा-गुंदेचा व स्नेहल उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुदर्शन कुलकर्णी, अमित झिरपे, कार्तिक नायर, गणेश भुतारे, बाळासाहेब नरसाळे, नंदकुमार येलुलकर, भास्करराव गायकवाड, भगवान राऊत, स्नेहल उपाध्ये, हनिफ शेख, शारदा होशिंग, संकेत होशिंग, शैलेश थोरात, दीपाली देऊतकर, तुषार बुगे, नंदकिशोर आढाव, श्रीकृष्ण बारटक्के, विनायक वराडे, प्रशांत अंतेपेल्लु, समीर पाठक, ऋषिकेश येलुलकर, तेजा पाठक, बाळकृष्ण गोटीपामुल, प्रसन्न येखे, पूजा देशपांडे, निखिल डफल, सुभाष भागवत, पूजा देशपांडे, अवंती होशिंग, भाग्यश्री राऊत आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment